Breaking news

Lonavala News : स्विमिंगपूल मध्ये पडून दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू

लोणावळा : प्रिछलीहिल भागातील एका बंगल्याच्या स्विमिंगपूल मध्ये पडून एका दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना आज सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरण मोहम्मदनदिम कैसरहुसेन सैयद (वय 31, रा. डोंबिवली) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली. तर हानियाझैरा मोहम्मदनदिम सैयद (वय 1 वर्षे 11 महिने) असे मयत झालेल्या बालिकेचे नाव आहे. लोणावळा शहर पोलीसांनी फिर्यादीवरून दिलेल्या माहितीनुसार कार्निवल विला बंगलो, प्रिचली हिल बार्क हॉटेलचे पाठीमागे लोणावळा येथे ही दुर्घटना घडली. मोहम्मदनदिम सैयद हे इतर सदस्यांसोबत आज सकाळी बंगल्यात नाष्टा करत असताना बाहेर असलेल्या स्विमिंगपूल मध्ये ही दुर्घटना घडली. बाहेरून अचानक ओरडण्याचा आवाज आल्याने ते सर्वजण बाहेर गेले असता त्यांना हानियाझैरा ही पाण्यात पडलेली दिसली. त्यांनी तिला पाण्यातून बाहेर काढून संजीवनी हॉस्पीटल, लोणावळा येथे आणली असता, डाॅक्टरांनी तीला तपासून मयत असल्याचे घोषीत केले. फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात मयत दाखल करण्यात आले असून तपास पोलीस उपनिरीक्षक मुजावर हे करत आहेत.

इतर बातम्या