Breaking news

Lonavala News : न्यु तुंगार्ली भागात बंगल्यात चोरी; 92 हजाराचा ऐवज लंपास

लोणावळा : न्यु तुंगार्ली भागातील एका बंगल्यात शनिवारी रात्री अज्ञात चोरट्याने गॅलरी वाटेत प्रवेश करत 92 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सरवम सौरभ बन्सल यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शनिवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास न्यु तुंगार्ली गोल्ड व्हॅली सेक्टर सी मधील टीटोस द हेल्वीव बंगल्यात हा प्रकार घडला. अंगावर रेनकोट व तोंडाला मास लावून अंदाजे 25 ते 30 वयोगटातील चोरटा गॅलरीतून आतमध्ये घुसला व दोन बेडरुम मधून अँपल कंपनीचा लॅपटाॅप, हातातील घड्याळ, रोख रक्कम, हेडफोन असा 92 हजार रुपयांचा ऐवज घेऊन लंपास झाला असल्याचे फिर्यादी मध्ये म्हंटले आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार उंडे हे तपास करत आहेत.

इतर बातम्या