Breaking news

Lonavala News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोणावळा नगरपरिषदेकडून विविध शालेय स्पर्धांचे आयोजन

लोणावळा : भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोणावळा नगरपरिषदेकडून विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. लोणावळा शहरातील सर्व शाळांनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन लोणावळा नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे. इयत्ता पाचवी ते दहावी च्या मुलांसाठी 5 वी ते 7 वी गट व 8 वी ते 10 वी या दोन गटात देशभक्तीपर समुहगीत स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता लोणावळा नगरपरिषद शाळा क्र. 1 याठिकाणी होणार आहे. यामध्ये कमीत कमी 12  व जास्तीत जास्त 16 मुलांचा सहभाग असावा तसेच वादकांची संख्या तीन पेक्षा जास्त नसावी असे सूचित करण्यात आले आहे. समुहगीय गायनासाठी 10 मिनिटे वेळ देण्यात आला आहे. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता लोणावळा नगरपरिषद शाळा क्र. 1 याठिकाणी वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा 3 री ते 4 थी (माझा आवडता क्रांतिकारक/स्वातंत्र्य सैनिक), 5 वी ते 7 वी (स्वातंत्र्य संग्रामातील एक प्रसंग/घटना), 8 वी ते 10 वी स्वातंत्र्यानंतरची 75 वर्ष), 11 वी ते 12 वी (आधुनिक भारत) या चार गटात चौकटील दिलेल्या विषयावर होणार आहे. या स्पर्धेसाठी एका शाळेचे जास्तीत जास्त दोन स्पर्धक सहभागी होऊ शकतील व त्यांना सादरीकरणासाठी गटनिहाय 3 ते 5 मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. 12 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता लोणावळा नगरपरिषद शाळा क्र. 1 याठिकाणी स्फुर्तीगीत/ देशभक्तीपर गायन स्पर्धा वैयक्तिक होणार आहे. सदर स्पर्धा 5 वी ते 7 वी, 8 वी ते 10 वी व 11 वी ते 12 वी या तीन गटात होणार असून या स्पर्धेत देखील प्रत्येक शाळेतील दोन स्पर्धक सहभागी होऊ शकतील. त्यांना सादरीकरणासाठी 6 मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. तरी लोणावळा शहरातील सर्व शाळांनी या स्पर्धांमध्ये सहभागी नोंदवावा. शाळांनी 8 ऑगस्ट पर्यत आपल्या शाळांची व विद्यार्थ्यांच्या नावाची नोंदणी लोणावळा नगरपरिषद ग्रंथालय येथे करावी. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी शालेय गणवेशात उपस्थित रहावे.

हर घर तिरंगा; जनजागृती रॅली

शासनाच्या आदेशानुसार देशात व राज्यात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. लोणावळा शहरात याबाबत जनजागृती करण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने येत्या 5 ऑगस्ट रोजी शहरात हर घर तिरंगा जनजागृती अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक शाळेचे किमान 100 व त्याहून अधिक विद्यार्थी हातात हर घर तिरंगा अभियान व देशभक्तीपर घोषवाक्य घेऊन सहभागी होणार आहेत. लोणावळा शहरातील विविध सामाजिक संघटना, संस्था, मंडळे, क्लब यांनी देखील यात सहभागी व्हावे असे आवाहन लोणावळा नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.


इतर बातम्या