Breaking news

Lonavala News : कुसुमबाई देवरे यांना राष्ट्रीय आदर्श माता पुरस्कार

लोणावळा : कै. सोनू अनाजी वाळंज विद्यालय आंबवणे या शाळेचे मुख्याध्यापक भटू देवरे यांच्या मातोश्री कुसुमबाई देवरे यांना नुकताच राष्ट्रीय आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आला. काव्यमित्र संस्था चिंचवड यांच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांचा स्मृतिदिन व राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमित्त तसेच जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. यावेळी माजी कुलगुरु डॉ पंडित विद्यासागर, नळदुर्ग महाविद्यालयाच्या जयश्रीताई घोडके, उद्योजक भाऊसाहेब जंजिरे, उदगिरचे अनंत कदम, डाॅ. हेमंत श्रीगिरे या मान्यवरांच्या शुभहस्ते सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

     या सोहळ्यास काव्यमित्र संस्थेचे सर्वेसर्वा राजेंद्र सगर, उपाध्यक्ष संजय जगताप, सचिव हरिनाथ कांबळे यांच्यासह कोराईगड शिक्षण संस्थेचे संस्थापक नंदकुमार वाळंज, मावळ वार्ता फाउंडेशनचे संस्थापक संजय आडसुळे, माजी सरपंच वत्सला वाळंज, विनय विद्वांस, गणपत मेंगडे, उल्हास मानकर, गणेश दळवी, गणेश वाळंज, सचिन चव्हाण, वसंत बोरसे, स्वप्नील ढगे, विलास देवरे, रविंद्र सोनवणे, सोपान कुंभार, राज इटेकर, वंदना बोरसे, शालिनी देवरे, विद्याताई देवरे, प्रणव बोरसे, सौरभ भामरे, विहान ढगे, भटू देवरे आदीं उपस्थित होते.

इतर बातम्या