Breaking news

Lonavala News : नांगरगावात छत्रपती संभाजी महाराज जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी

लोणावळा : जयहिंद मित्र मंडळ, शिवजन्मोत्सव मंडळ नांगरगाव यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. सकाळी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर इतिहास अभ्यासक विनय दाभाडे यांचे व्याख्यान झाले. महिलांसाठी संगीत खुर्ची व लोकनृत्य स्पर्धा इत्यादी विविध कार्यक्रम घेण्यात आले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

       या कार्यक्रमास शिवसेना माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, शिवसेना लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, लोनप माजी शिक्षण समिती सभापती ब्रिंदा गणात्रा, माजी शहरप्रमुख बबनराव अनसुरकर, उपशहरप्रमुख संजय भोईर,‌ विभाग प्रमुख उल्हास भांगरे,‌ माजी शिक्षण मंडळ सभापती प्रदीप थत्ते, शंकरभाऊ जाधव, मारुती जाधव, बाळासाहेब जाधव, शाखा प्रमुख गणेश जाधव, उमेश शिरंबेकर, अनिल भांगरे, धीरज घारे, विवेक भांगरे, प्रशांत जाधव, रामचंद्र दुर्गे, नितीन दुर्गे, विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टचे पदाधिकारी व नांगरगाव विभागातील महिला भगिनी, लहान मुले सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण बलकवडे यांनी केले.

इतर बातम्या