Breaking news

Lonavala News : बंगले भाड्याने देताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या - अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे

लोणावळा : पर्यटनाचे ठिकाण असलेल्या लोणावळा व परिसरातील ग्रामीण भागात खाजगी बंगले भाड्याने दिले जातात. हा व्यावसाय करत असताना तो कायदेशीर नियमांचे पालन करून केला जावा, तसेच बंगले भाड्याने देताना सोसायट्यांमधील इतर नागरिकांना व शेजार्‍यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे यांनी बंगले धारकांना केले आहे.

     लोणावळा उपविभागातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंगले, रिसॉर्ट, टेंट मालक, चालक, केअरटेकर, यांची संयुक्त बैठक मंगळवारी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रांगणात पार पडली. यावेळी पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे यांच्यासह लोणावळा उपविभागाचे पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्यासह व्यावसायिक उपस्थित होते.

     लोणावळा व मावळ तालुका परिसरात येणारे पर्यटक व त्यांना पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधा तसेच निवास व्यवस्था देताना त्या कायद्याच्या चौकटीत राहून पुरविण्यात याव्यात. वरील आस्थापना चालविताना सर्व संबंधित विभागाच्या कायदेशीर परवानग्या घेण्यात याव्यात, खाजगी बंगले मालक, चालक यांनी बंगल्याकरिता कमर्शिअल परवाने घेण्यात याव्यात, मद्याचा वापर होणार असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभाग यांचा परवाना घेण्यात यावी, स्पीकर वापरणार असल्यास संबंधित पोलीस स्टेशन कडून परवाना घेऊन विहित वेळेत व मर्यादित आवाजात वापर करावा, आपल्याकडील आस्थापना मध्ये CCTV यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, येणाऱ्या पर्यटकांमुळे सोसायटीमधील आणि आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, येणाऱ्या सर्व पर्यटकांचे ओळखपत्र घेऊन सविस्तर नोंद करून त्याचे रजिस्टर तयार करावे, केअरटेकर, पेपरवाले, वायरमन, प्लंबर व इतर यांची संपूर्ण माहिती अद्यावत करून ठेवावी, त्यांची चारित्र्य पडताळणी करून घ्यावी, आपल्याकडे राहून देश विघातक अथवा गंभीर गुन्हे करण्यासाठी आपली आस्थापना वापरणार नाहीत याकरिता त्यांचे सर्वांचे संपूर्ण वर्णन, वाहनाचे नंबर, प्रकार आपल्याकडे नोंद असावेत,  खाजगी बंगल्यात आलेल्या पर्यटकांना वेळेची मर्यादा घालून घ्यावी, सूर्यास्तानंतर स्वामींग पुलचा वापर करण्यास देऊ नये आदी सूचना पोलीस विभागाकडून देण्यात आल्या. तसेच त्यांना लेखी नोटिसची देखील बजावणी करण्यात आली आहे.    

      याबैठकीत अनेक नागरिकांनी पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे इतर नागरिकांना त्रास होत असल्याची सूचना केल्या होत्या. त्यावर बोलताना अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे म्हणाले, पर्यटन वाढीबरोबरच पर्यटकांची सुरक्षा सर्वार्थाने आपण केली तर एक सशक्त वातावरण तयार होऊन पर्यटनस्थळ म्हणून लोणावळा व मावळ तालुक्याचा भाग अधिक सुंदर होऊ शकेल. नियमांच्या पालनाबरोबर जबाबदारीने दायित्व स्वीकारल्यास सर्वांसाठीच एक सुरक्षित वातावरण तयार होईल. यापुढे सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा वरील सूचनांचे व नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. स्थानिक पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग अशी संयुक्त कारवाई करण्यात येणार असल्याने अशा आस्थापना चालक, मालक यांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील करण्यात आले.

इतर बातम्या

वसंत व्याख्यानमाला | कारगिल टायगर हिल्सवर 150 जणांच्या विरोधात आम्ही 7 जण लढलो, डोळ्यातून - नाकातून रक्त गळत होते, अंगभर गोळ्या होत्या मात्र लढण्याची जिद्द व आत्मविश्वास कायम होता - परमवीर चक्र विजेते योगेंद्र सिंह याद