Breaking news

Lonavala News : लोणावळा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी विनोद होगले

लोणावळा : लोणावळा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी विनोद होगले यांची नियुक्ती करण्यात आली. मावळचे आमदार सुनिल शेळके व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी सदरचे नियुक्तीपत्र प्रदान केले. यापुर्वी होगले यांनी लोणावळा शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व युवक काँग्रेसचे अध्यक्ष पद भुषविले होते. नियुक्तीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष साहेबराव कारके, लोणावळा शहर कार्याध्यक्ष रवी पोटफोडे, माजी शहराध्यक्ष जीवन गायकवाड, भरत हारपुडे, दत्तात्रय गोसावी, सनी दळवी, अजिंक्य कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.

इतर बातम्या