Breaking news

Lonavala Gramin : चोर्‍या रोखण्यासाठी गावा गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यन्वित करा - प्रविण मोरे

कार्ला (प्रतिनिधी) : थंडीचे दिवसात चोऱ्यांच्या घटना वाढत असतात यासाठी  प्रत्येक गावातील नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे तसेच गावागावात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यन्वित करुन आपल्या गावाला सुरक्षित करा असे मत लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरिुक्षक प्रविण मोरे यांनी केले.

       लोणावळा ग्रामीण हद्दीतील भाजे, कुसगाव, पाटण, शिलाटणे, वेहरगाव, कार्ला या गावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी बौद्ध विहारात जाऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले तसेच भाजे, मळवली, वाकसई ग्रामपंचायत येथे ग्राम सुरक्षा अभियानाची माहिती देण्यात आली.

     यावेळी गावच्या सुरक्षतेसाठी व पोलीस प्रशासनाला कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही गावातील चौका चौकात लावणे गरजेचे असून ज्यांनी सीसीटीव्ही लावले नसतील त्यांनी लवकरच लावावे अशा सूचना देखील देण्यात आल्या. लोणावळा पोलिस निरिक्षक प्रविण मोरे यांंच्यासह लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, पोलीस कर्मचारी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावचे पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

इतर बातम्या