Breaking news

Lonavala Good News : लोणावळ्यात लवकरच गोरगरीबांना दुपारचे जेवणही मोफत मिळणार

लोणावळा : लोणावळा शहरात हातावर पोट असणार्‍या गोरगरिब नागरिकांसाठी रात्रीच्या जेवणाची मोफत सोय कुरवंडे गावातील शिव महादेव मंदिराच्या वतीने लोणावळा भाजी मार्केट याठिकाणी करण्यात आला आहे. लवकरच याच ठिकाणी भांगरवाडी सत्यानंद तिर्थधाम च्या वतीने दुपारच्या जेवणाची मोफत व्यवस्था केली जाणार आहे.

    सत्यानंद तिर्थधाम आश्रमातील गुरुजी विजेंद्रजी यांच्या जन्मदिवसानिमित्त आज नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक श्रीधर पुजारी, भाजपा गटनेते व नगरसेवक देविदास कडू यांनी आश्रमात जाऊन गुरुजींना शुभेच्छा दिल्या. तसेच गुरुजींनी देखील नगराध्यक्षा जाधव व सर्व टिमचा स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात दुसरा क्रमांक आल्याबद्दल सन्मान केला. यावेळी गुरुजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोरगरिबांसाठी दुपारच्या जेवणाची सोय करण्याची मागणी तात्काळ मान्य करण्यात आली. येत्या काही दिवसात हा उपक्रम सुरु होणार आहे. 

    यावेळी मावळवार्ता फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पारेख, संचालक संजय आडसुळे, विनय विद्वांस व सर्व टिम उपस्थित होते. दर रविवारी सत्यानंद तिर्थधाम आश्रम भांगरवाडी येथे लोणावळा व परिसरातील नागरिकांसाठी राम नामाच्या जपांचा सत्संग सुरु करण्यात आला आहे. यामध्ये लोणावळा शहरातील अनेक नागरिक सहभागी होऊ लागले आहेत. राम नामाचा जप व भुकेल्या नागरिकांना अन्न हे दोन उपक्रम या आश्रमाच्या माध्यमातून सुरु आहे. मागील दोन महिन्यांपासून लोणावळा परिसरात सत्यानंद तिर्थधाम च्या वतीने दुपारी 500 नागरिकांना मोफत अन्नदान केले जात आहे. याप्रसंगी बोलताना नगराध्यक्षा जाधव यांनी सत्यानंद तिर्थधाम आश्रमाला शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच सत्संगाच्या माध्यमातून समाजात धार्मिकता निर्माण होत असल्याचे प्रतिपादन केले.

इतर बातम्या