Breaking news

Lonavala Crime News : खोटे दस्त व खोटा मालक उभा करून फसवणूक करणार्‍या पाच जणांना अटक

लोणावळा : पवन मावळातील काले या गावातील जमीन गट नं. 404 क्षेत्र 1 हेक्टर 56 आर चे मूळ मालक अभय जसानी या नावाने खरेदी केलेला मूळ दस्त जसानी यांनी दुय्यम निबंधक कार्यालयामधून घेतला नाही. याची माहिती मिळाताच मावळातील काही जणांनी सदरचा दस्त दुय्यम निबंधक कार्यालयातून काढून घेतले. एक वयस्कर इसम त्याचे नाव अभय जसानी आहे असे सांगून त्याचे अभय घनशाम जसानी नावाने आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करुन त्या आधारे लोणावळा येथील दुय्यम निबंधक कार्यालय लोणावळा येथे दि. 06/10/2022 रोजी येवून अभय जसानी याचे नाव धारण केलेला इसम नामे लालजीभाई भानुप्रसाद अधियारु (वय 62 व हल्ली रा. गोरेगांव मुंबई यास हा खरा आहे असे सांगून त्यास 1) आकाश वसंत ठाकूर रा. पेण जि. रायगड, 2) अमोल कृष्णा दाभोळकर रा. अंधेरी मुंबई, 3) रवी दशरथ कालेकर रा. कुसगांव यांनी ओळख दाखवून 4) अविनाश नथुराम होजगे रा. भांगरवाडी लोणावळा यांनी मध्यस्ती करुन व विश्वास संपादन करुन मधुसुदन शोभाचंद तापडीया (रा. ठाणे) व विजय बलराम शर्मा (रा. घाटकोपर मुंबई) यांनी संगनमत करुन ती खरेदी केली आहे. याप्रकरणी अभय जसानी यांच्या वतीने रतन मोतीराम मराठे (रा. भुशी लोणावळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या आधारे सदर गुन्हयातील एकूण 5 आरोपींना दि. 12/11/2022 रोजी लोणावळा ग्रामीण पोलीसांनी अटक केली असून त्यांची दि. 18/11/2022 रोजीपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे. सदर आरोपींनी या अगोदर अशा प्रकारे किती गुन्हे करून जनतेची फसवणूक केली आहे काय? याबाबत कसून तपास चालू आहे. अशाप्रकारे मावळ परीसरामध्ये यापुर्वीसुध्दा अशा प्रकारे बरेच लोक जमीनीवर डोळा ठेवून त्या जमनीमध्ये कोणी येत जात नसल्याची माहिती घेवून त्या जागेवर दुसरा इसम उभा करून आपआपसात खरेदी विक्रीचे व्यवहार करीत असलेबाबत तक्रारी दाखल आहेत. यापुढे जर अशा प्रकारची कोणाची फसवणूक झाली असेल तर संबंधी पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे. सदरची कामगि री ही पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा उप विभागाचे अधिकारी सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहा. पोलीस निरीक्षक श्री. निलेश माने, सहा. पोलीस निरीक्षक श्री. सचिन राऊळ, व पोलीस अंमलदार तपास करीत आहेत.

इतर बातम्या