Breaking news

Lonavala City Police : लोणावळा शहर पोलीस ठाण्यात उद्या तक्रार निवारण दिन; तक्रार अर्जदार व गैरअर्जदार यांना हजर राहण्याचे आवाहन

लोणावळा : लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वतीने गुरुवारी (9 डिसेंबर) रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या तक्रार निवारण दिनात तक्रार अर्जदार व गैरअर्जदार यांनी उपस्थित राहून आपल्या तक्रारींचा निपटारा वरिष्ठ अधिकार्‍यांच्या समक्ष करून घ्यावा असे आवाहन लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी केले आहे.

     पोलीस ठाण्यांमध्ये अनेक तक्रार अर्ज दाखल असतात, या अर्जांच्या अनुषंगाने तक्रारांची निवारण करणे, दोन्ही पक्षकारांना समोर बोलवत सामोपचाराने प्रकरण मिटत असल्यास मिटविणे अथवा दखलपात्र घटना असल्यास गुन्हा दाखल करणे असा प्रकारे तक्रार निवारण दिनाचे काम चालत असल्याने नागरिकांनी याचा लाभ घेत ज्यांचे अर्ज आहेत त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 4 दरम्यान हे कामकाज चालणार आहे.

इतर बातम्या