Breaking news

Lonavala City Police : बेकायदा विक्रीसाठी दारु घेऊन जाणार्‍याला दुचाकीसह पकडले

लोणावळा : बेकायदा दारु विक्रीसाठी माल घेऊन जाणार्‍या एका युवकाला लोणावळा शहर पोलिसांनी लोणावळा गावठाण येथव दुचाकीसह ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून 10 हजार 500 रुपयांची दारु व दुचाकी असा एकूण 60 हजार 500 रुपयांचा माल जप्त केला आहे. 

    शेरा रामप्रकाश गुर्जर (वय 22, रा. जयमातादी हाॅटेल वरसोली. मूळ राहणार फिरोजाबाद, उत्तरप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. आज दुपारी साडेबारा वाजता लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नितिन सुर्यवंशी, हनुमंत शिंदे, पोलीस काॅन्स्टेबल मनोज मोरे, पवन कराड, स्वप्निल पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली. थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी दारु बेकायदा विक्री करण्यासाठी नेहली जाते. अशा व्यक्तीची माहिती काढत लोणावळा शहर व ग्रामीण पोलिसांनी विशेष पथके तयार करत कारवाई मोहिम हाती घेतली आहे.

इतर बातम्या