Breaking news

Lonavala Breaking News : संत बाळूमामा मंदिरात चोरी; दोन दानपेट्या फोडल्या

लोणावळा : पांगळोली गावातील प्रसिद्ध असलेल्या संत बाळूमामा मंदिरात रविवारी रात्री ते सोमवारी पहाटे दरम्यान चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दोन दानपेट्या फोडत एक लाखाहून अधिक रक्कमेचा ऐवज लंपास केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. लोणावळा शहरातील पांगळोली येथे संत बाळूमामा यांचे मंदिर आहे. हजारो भाविक दर्शनासाठी याठिकाणी येत असतात. नुकत्याच झालेल्या आषाढ अमावस्येला मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गत सहा महिन्यांपासूनची दानपेटीत दान जमा झाले होते. अज्ञात चोरट्यांनी या दानपेट्यांवर हात मारत चोरी केल्याने परिसरात भितीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वरसोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच व संत बाळूमामा देवस्थानचे प्रमुख बबन खरात यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी माहिती दिली. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

इतर बातम्या