Breaking news

Lonavala Accident : खंडाळा गावाजवळ कार व दुचाकी अपघातात लोणावळ्यातील दोन जणांचा मृत्यू

लोणावळा : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा येथे शुक्रवारी (15 आँक्टोबर) रोजी दुपारी 3.45 वाजता झालेल्या कार व दुचाकी यांच्या अपघातात लोणावळ्यातील दोन जणांचा मृत्यू झाला. दसर्‍याच्या दिवशी झालेल्या या दुःखद घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    लोणावळा शहर पोलीस दिलेल्या माहितीनुसार मोहित सुनिल पायगुडे (वय 39, रा. खोंडगेवाडी, लोणावळा) व गौतम बेहरा (वय 35 रा. लोणावळा) य‍ांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कारचालक विवेक परमेश्वरन नायर (वय 41, रा. सी.बी.डी.बेलापुर,नवी मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास विवेक नायर यांनी मुंबईच्या दिशेने जाताना त्यांच्याकडील कार क्र. (MH 14 DN 3638) हीने लोणावळ्याच्या दिशेने येणारी दुचाकी क्र. (MH 14 ET 2919) हीला जोरदार धडक दिल्याने सदरचा अपघात झाला. या अपघातात पायगुडे व बेहरा यांना गंभिर मार लागल्याने त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

    याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार घोटकर तपास करत आहेत.

इतर बातम्या