Breaking news

पिंपरीत विहार तेथे ग्रंथालय उपक्रम; सात विहारांना पुस्तके भेट

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल इंजिनियर असोशियन व बौद्ध विकास महासंघ पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमानाने पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील विहारांमध्ये पुस्तक आणि ग्रंथ भेट देण्याचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. विहार तेथे ग्रंथालय अशी या उपक्रमामागील संकल्पना असून याकरिता सात विहारांमध्ये पुस्तके भेट देण्यात आली.

    इंजीनियर असोसिएशनच्या माध्यमातून बुद्ध विहार तेथे ग्रंथालय अशा उपक्रमातून सदर अभियान राबविण्यात येत आहे. विहारांमध्ये स्पर्धा परीक्षा, धार्मिक, सामाजिक व मान्यवर आदर्शांची पुस्तके भेट देण्यात आली. विहारातील सर्व सदस्यांना याचा वापर करता येईल व आपल्याला आपला इतिहास सामाजिक आर्थिक बाबींचा अभ्यास करता येईल या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चिखली ताम्हाणे वस्ती येथील सिद्धार्थ विहार या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस व इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते तसेच बानाई च्या वतीने सर्व अभियंता वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय कांबळे तसेच कार्यक्रमाचे नियोजन अंकुर सेवा संघ सिद्धार्थ बुद्ध विहार यांच्यावतीने करण्यात आले होते.

इतर बातम्या

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट इ. यांच्याकरिता सीआरपीसी कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी; पालन न करणाऱ्या आस्थपनांवर होणार कठोर कायदेशीर कारवाई