Breaking news

Lonavala Crime News : लोणावळ्यात रेल्वे ट्रॅक जवळ युवकावर चाकू हल्ला

लोणावळा : तुम्ही या रस्त्याने पुढे जायचे नाही असे म्हणत टेबल लॅन्ड येथे रेल्वे ट्रॅक जवळ लोणावळ्यातील एका युवकावर चाकु हल्ला झाल्याची घटना (Lonavala Crime News) शुक्रवारी (20 जानेवारी) रोजी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अमित सलेंदर चौरसिया (वय 28, रा. पांगोळी, लोणावळा. मूळ रा. सिहटीकर ता. खलीलाबाद जि. संतकबीर नगर राज्य उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे.

    शुक्रवारी अमिय चौरसिया हे टेबल लँन्ड जवळून जात असताना एका 25 ते 30 वयोगटातील अनोळखी युवकाने काही एक कारण नसताना तुम्ही या रस्त्याने जायचे नाही असे बोलून फिर्यादी समोर येऊन त्याच्या हातातील चाकू सारखे हत्याराने फिर्यादीचे पोटात मारून गंभीर जखमी केले. काल 22 जानेवारी रोजी रविवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार म्हेत्रे घटनेचा तपास करत आहेत.

इतर बातम्या