Breaking news

किरिट सोमय्या यांना कराड रेल्वे स्थानकावर पोलिसांनी ताब्यात घेतले

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराड रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले आहे. सोमय्या सोमवारी कोल्हापूरला भेट देणार होते. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते आणि जिल्ह्यात कलम 144 सुरु असल्याने, 20 आणि 21 सप्टेंबरला एकत्र येण्यास मनाई केली होती. तत्पूर्वी, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रविवारी दावा केला की, महाराष्ट्राचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना जिल्हा अधिकाऱ्यांनी कायदा आणि सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या कारणामुळे कोल्हापुरात प्रवेश करण्यास मनाई केली होती.

     काही दिवसांपूर्वी सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री आणि कोल्हापूरचे कागलचे आमदार मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे गुप्त ठेवल्याचा आरोप केला होता, नंतर मंत्र्यांनी आरोप निराधार असल्याचे सांगत ते फेटाळून लावले. सोमय्या, हे सोमवारी पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुर जिल्ह्याला भेट देणार होते. सोमय्या यांनी केलेले आरोप व त्यानंतर कोल्हापुर येण्याचे दिलेले आवाहन यामुळे मुश्रीफ समर्थक यांनी सोमय्या यांनी कोल्हापुरात येऊन दाखवावे असे दिलेले प्रती आवाहन यामुळे कोल्हापुरात वातावरण तापले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता कोल्हापुर जिल्ह्यात कलम 144 लागू करत सोमय्या यांना कोल्हापुरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. 

   या आदेशात असेही म्हटले आहे की, पोलीस गणपती विसर्जनामध्ये व्यस्त असतील आणि सोमय्या यांना सुरक्षा देणे शक्य होणार नाही. मुंबईतील नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील कांबळे यांनीही सोमय्या यांना नोटीस बजावत कोल्हापूर प्रशासनाच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले होते. त्यानंतरही सोमय्या हे कोल्हापूरकडे महालक्ष्मी एक्सप्रेस गाडीने रवाना झाले होते.

इतर बातम्या