Breaking news

धक्कादायक ; खंडाळ्यातून अल्पवयीन मुल‍ाचे अपहरण - अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल

लोणावळा : खंडाळा नेताजीवाडी येथील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचे खंडाळा रेल्वे स्थानकावरून कोणीतरी अज्ञात कारणावरून अपहरण केले आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण झालेल्या मुलाचे वडील परशूराम पवार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून याप्रकरणी पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुजावर तपास करत आहेत. 


इतर बातम्या