Breaking news

Crime News : अंधाराचा फायदा घेवून घरफोडी करणाऱ्या दोघांच्या खोपोली पोलिसांनी आवळल्या मुसक्या

खोपोली (प्रतिनिधी) : खोपोली पोलीस हद्दीतील राज इलेक्ट्रॉनिक्स या मोबाईल दुकानात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शटरचे कुलूप तोडून पाच मोबाईल चोरून दोन इसम पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम व डीबी टीम यांना तपास करण्यासाठी आदेशित केले. 19 जुलै रोजी सदरची घटना घडली होती. या घटनेच्या अनुषंगाने घटना घडलेल्या रात्रीच्या वेळेतील रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे शहरातील बाहेर जाणाऱ्या रस्त्या लगतचे कॅमेरे तसेच त्यावेळेस शहरात आलेली संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू केली आणि माहिती घेण्यास सुरुवात केली. त्या दरम्यान घरफोडी करणाऱ्या दोन इसमांची अस्पष्ट छायाचित्रे समोर आली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधार व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून 6 ऑगस्ट रोजी घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांचा शोध घेण्यात खोपोली पोलिसांना यश आले. सदर गुन्ह्यातील दोन आरोपींपैकी एक आरोपीत हा मर्डरच्या गुन्ह्यात बारा वर्षे शिक्षा भोगलेला असून दुसरा आरोपीत  हा मर्डरच्या गुन्ह्यात तब्बल 20 वर्ष शिक्षा भोगून 2021 मध्ये बाहेर आलेला आहे. अशा आरोपींना अतिशय कौशल्य पूर्ण योग्य पद्धतीने ताब्यात घेण्यात टीमला यश आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम यांच्यासह पोलीस हवालदार प्रसाद पाटील, पोलीस शिपाई प्रदिप खरात, रामा मासाळ, दत्ता नुलके, स्वागत तांबे यांनी सदरची कामगिरी बजावली. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम हे करत आहेत.

इतर बातम्या