Breaking news

Kamshet News : महर्षी कर्वे आश्रमशाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

कामशेत : महर्षी कर्वे अनुदानित आश्रमशाळा कामशेत येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे कार्यवाह बाळासाहेब लोहकरे व डॉक्टर मीनल कुलकर्णी यांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर राष्ट्रध्वजाचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. सदर कार्यक्रमांमध्ये आश्रम शाळेतील इयत्ता दहावीची विद्यार्थींनी मनीषा डाखोरे ने मनोगत व्यक्त केले. इयत्ता नववीची विद्यार्थिनी रवीना मोहिते व इयत्ता आठवी ची विद्यार्थिनी समृद्धी कपडे यांनी ऑनलाइन भाषण केले. तसेच आश्रम शाळेच्या प्राथमिक शिक्षिका प्रेमकला वैभव पाठक यांनी 26 जानेवारी व संविधान यावर आपले विचार मांडले. 

     सदर कार्यक्रमास शाला समिती सदस्य धनंजय वाडेकर, विक्रम बाफना, संजय जोशी (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोणावळा तालुका सहकार्यवाह) ग्रामस्थ नवनाथ ठाकर, युवराज शिंदे, हिरामण शिंदे, शंकर पिंगळे दिनेश कुलकर्णी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता देवरे सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद व इयत्ता 10 वी च्या विद्यार्थींनी व ऑनलाइन विद्यार्थी, पालक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरीनाथ वाडेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम पवार यांनी केले.

इतर बातम्या