Breaking news

खालापूर तालुका न्यायालयाच्या परिसरात न्यायाधीशांनी केले वृक्षारोपण

खालापूर (प्रतिनिधी) : विकासाच्या नावाने होणारी वृक्षतोड, वेगवेगळ्या कारणांनी होणारा जंगलाचा ऱ्हास त्याचसोबत अनियमित पाऊस आणि जलस्त्रोतांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. या बाबींचा सखोल अभ्यास करून पातळ गंगा नदी व पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून खालापूर तालुक्यात पाच हजार वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा संकल्प हाती घेतला आहे. लोकसहभागातून पर्यावरणाचा विकास साधण्याचे उद्दिष्ट ठेवून खालापूर न्यायालय परिसरात वृक्ष लागवडीचे आयोजन केले गेले. खालापूर तालुका न्यायालय परिसरात कनिष्ठ न्यायाधीश प्रमोद माने, कनिष्ठ न्यायाधीश श्रीमती लता सकपाळ, बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड रशीद भुसारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी खालापूर बार असोसिएशनचे सर्व सदस्य,  न्यायालयीन कर्मचारी आणि पाताळगंगा नदी व पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अरुण जाधव व संस्थेचे पदाधिकारी यांनी सहभाग घेऊन वृक्षारोपणही केले.

इतर बातम्या