लोणावळ्यात वाहतूक पोलीस व आरटीओ यांची 50 वाहनांवर संयुक्त कारवाई; दीड लाख दंड
लोणावळा : लोणावळ्यात आज लोणावळा शहर वाहतूक पोलीस व आरटीओ अधिकारी यांनी संयुक्तपणे 50 वाहनांवर कारवाई करत 1 लाख 50 हजार रुपये दंड आकारणी केली आहे. ओला उबर सह अवैध प्रवाशी वाहतूक करणारी वाहने, स्कूल व्हॅन, ट्रीपल सीट जाणारे दुचाकी चालक यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. ओला उबर या वाहनांना लोणावळ्यात ऑनलाईन बुकींग घेण्यास बंदी असताना देखील ते अवैधपणे बुकींग घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. आज लोणावळा शहर वाहतूक पोलीस व आरटीओ अधिकारी प्रदीप शिनगारे यांच्या पथकाने दिवसभर लोणावळ्यात संयुक्त कारवाई केली. आरटीओ अधिकारी प्रदीप शिनगारे व त्यांची संपूर्ण टीम तसेच लोणावळा वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार अनिल शिंदे व पोलीस कर्मचारी व वॉर्डन यांनी ही कारवाई केली.