Breaking news

समर्थ स्पोर्ट्स च्या नविन दालनाचा भांगरवाडीत उद्धघाटन समारंभ संपन्न

लोणावळा : मावळ तालुका तसेच लोणावळा शहरातील क्रिकेटर, क्रिकेट प्रेमी यांच्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे क्रिकेट साहित्य तसेच इतर खेळाची साहित्य यांची ग्राहकांना गेले 3-4 वर्ष सेवा घरातून देत, आज समर्थ स्पोर्ट्सच्या अधीकृत दालनाचा लोणावळा शहरात भांगरवाडी येथील बेंद्रे हाईटस याठिकाणी उद्धघाटन समारंभ पार पडला.

    यावेळी मुख्य पाहुणे परेश दादा चवरकर (वाॅरीयर्स क्रिकेट बॅट कंपनी चे मालक), लोणावळा शहर पोलीस नितेशजी कवडे (बंटी भाऊ) यांच्या हस्ते फीत कापून उद्धघाटन करण्यात आले.

    खरंतर समर्थ स्पोर्ट्स च्या माध्यमातून मावळ तालुक्यातील तसेच लोणावळा शहरातील बरेच क्रिकेट रसीक ग्राहक बनले आहेत, याचे मुख्य कारण म्हणजे समर्थ स्पोर्ट्सची दर्जेदार उत्पादने. यामध्ये मुख्यतः वाॅरीयर्स कंपनीच्या क्रिकेट बॅट तसेच क्रिकेट सुट आणि त्याचबरोबर ग्राहकांच्या मागणीनुसार टि-शर्ट प्रिंट करून देणे. या मुख्य सेवेमुळे मोठ्या प्रमाणात समर्थ स्पोर्ट्स चा ग्राहकवर्ग तयार झाला आहे.

    या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष महेश केदारी, नगरसेवक भरत हारपुडे, शिवदास पिल्ले, लोणावळा शिवसेना प्रमुख बाळासाहेब फाटक, समन्वयक जयवंत दळवी, उपशहरप्रमुख संजय भोईर, मनेष पवार,विभाग प्रमुख भगवान देशमुख, शिवसैनिक संजय शिंदे, भगवान थरकुडे यांच्यासह लोणावळा व मावळ परीसरातील सर्व क्रिकेट खेळाडू उपस्थित होते.

इतर बातम्या