Breaking news

डिजिटल स्किल इन्स्टिट्यूट व माणुसकी प्रतिष्ठान शाखा अलिबाग कार्यालयाचा उद्घाटन सोहळा

खोपोली (प्रतिनिधी) : अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर 3 मे रोजी रायगड अलिबाग जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांचे हस्ते डिजिटल स्किल इन्स्टिट्युट व माणुसकी प्रतिष्ठानच्या अलिबाग कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. 

       उद्घाटन प्रसंगी आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून ॲड. मनमीत पाटील, कामगार नेते दीपक रानवडे, आय एम ए अध्यक्ष डॉ विनायक पाटील, रोटरी अध्यक्ष डॉ चांदोरकर, लायन्स मांडवा अध्यक्ष मोहन पाटील, लायन्स अलिबाग महेंद्र पाटील, रोहन पाटील, अलिबाग मुरुड मेडिकल असो. चे डॉ प्रणाली पाटील, डॉ. साबू, सुरभी संस्था अध्यक्ष सुप्रिया जेधे, कल्पेश, अभिनेते राजन पांचाळ, इतर मान्यवर माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, रायगड जिल्हा परिषद समन्वयक जयवंत गायकवाड, माणुसकी अध्यक्ष सांगोला अतुल कावळे, माणुसकी अध्यक्ष पेण आशिष कडू, शाखा अलिबागचे उपाध्यक्ष श्वेता घरत, पल्लवी पाटील, उज्ज्वला चव्हाण, दिलीपकुमार भड, ॲड राधिका पाठक, संपर्क प्रमुख ॲड. भुपेंद्र पाटील, शशिकला फणसे, रावसाहेब माळी, वसंत जंजीरकर, योगेश घरत, माणुसकी महाराष्ट्र कार्याध्यक्ष तानाजी आगलावे, सचिव महाराष्ट्र विशाल आढाव, कृष्णा वाघमारे, संजय काळेल, दीपक, सुधाकर, मंगेश, विवेक, रेखा ठाकूर, डिजिटल स्किल चे प्रमुख हर्षल कदम, सोनल उपस्थित होते. शाखा अध्यक्ष ॲड. भूषण जंजिरकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. खजिनदार गौरव माळी यांनी पदाधिकारी यांची ओळख करून दिली. 

      डिजिटल स्किल चे प्रमुख हर्षल कदम यांनी 500 मुलांना मोफत बेसिक कॉम्प्युटर सर्टिफिकेट कोर्स व करिअर मार्गदर्शन माणुसकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून देणार असल्याचे सांगितले. डॉ हुलवान यांनी माणुसकी च्या प्रत्येक सदस्याने कमीत कमी 5 झाडे लावण्याचे आवाहन केले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन सचिव संदीप वारगे यांनी केले.

इतर बातम्या