Breaking news

केंद्राकडून अबकारी करात कपात; पुण्यात पेट्रोल 9 तर डिझल 7 रुपयांनी स्वस्त - CNG महागला

पुणे : केंद्र सरकारने कोरोना काळात वाढविलेल्या उत्पादन शुल्कात (अबकारी कर) अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी शनिवारी सायंकाळी कपात करत असल्याची घोषणा केल्यामुळे देशभरात पेट्रोल व डिझेलच्या दर कमी झाले आहेत. पुण्यात पेट्रोल चे भाव लिटर मागे 9.09 रुपये तर डिझेल चे भाव लिटर मागे 7.31 रुपयांनी कमी होणार असल्याची माहिती ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारुवाला यांनी दिली. आज पहाटे 1 वाजल्यापासून नविन दर लागू झाले आहेत. केंद्राच्या धर्तीवर राज्याने देखील उत्पादन शुल्कात कपात करत नागरिकांना दिलासा द्यावा अशी विनंती दारुवाला यांनी केली आहे. पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले असले तरी सिएनजीच्या दरात मात्र 2.80 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे पुण्यात सिएनजी 80 रुपये प्रतिकिलो झाला आहे. 

    

इतर बातम्या