Breaking news

पुणे विभागात 19 लाख कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत; रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.29 टक्के

पुणे : पुणे विभागातील 19 लाख 33 हजार 44 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पुणे विभागात बाधित रुग्णांची संख्या 19 लाख 87 हजार 224 झाली आहे. तर सक्रिय रुग्ण संख्या 12 हजार 753 इतकी आहे. कोरोनाबाधित एकूण 41 हजार 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.27 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

 पुणे जिल्हा : पुणे जिल्ह्यातील बाधित एकूण 11 लाख 35 हजार 634 रुग्णांपैकी 11 लाख 10 हजार 111 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण 6 हजार 741 आहेत. तर बाधित एकूण 18 हजार 782 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के इतके आहे, तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.75 टक्के आहे.

सातारा जिल्हा : सातारा जिल्ह्यातील बाधित एकूण 2 लाख 47 हजार 468 रुग्णांपैकी 2 लाख 37 हजार 952 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 3 हजार 258 आहे. बाधित एकूण 6 हजार 258 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा : सोलापूर जिल्ह्यातील बाधित एकूण 2 लाख 399 रुग्णांपैकी 1 लाख 94 हजार 18 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 1 हजार 413 आहे. 4 हजार 959 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा : सांगली जिल्ह्यातील बाधित एकूण 1 लाख 97 हजार 757 रुग्णांपैकी 1 लाख 91 हजार 657 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 840 आहे. बाधित 5 हजार 260 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा : जिल्ह्यातील बाधित 2 लाख 5 हजार 975 रुग्णांपैकी 1 लाख 99 हजार 702 रुग्ण बरे होऊन गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 501 आहे. बाधित 5 हजार 772 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

इतर बातम्या