Breaking news

मावळ तालुक्यात आज महालसीकरण अभियानात 7281 जणांचे लसीकरण करण्यात आले

लोणावळा : मावळ तालुक्यातील कामशेत, वडगाव व सोमाटणे या मुख्य केंद्रांसह तालुक्यातील उर्वरित केंद्रावर आज महालसीकरण अभियान राबविण्यात आले. 

    या एकदिवसीय लसीकरण मोहिमे अंतर्गत आज सोमवारी (13 सप्टेंबर) रोजी वडगाव नगरपंचायत क्षेत्रात : 1520,  सोमाटणे ग्रामपंचायत क्षेत्रात : 2796, खडकाळा ग्रामपंचायत क्षेत्रात : 2965 असे एकुण 7281 जणांचे लसीकरण करण्यात आले. तर मावळ तालुक्यातील इतर कार्यक्षेत्रात मागील 3 दिवसात 6313 लाभार्थ्यांचे असे असे एकूण 13594 जणांचे लसीकरण शनिवार ते सोमवार या कालावधीत पुर्ण करण्यात आले असल्याची माहिती मावळ तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

    सद्यस्थितीत 16 जानेवारी 2021  पासून 13 सप्टेंबर 2021 या कालावधीत मावळ तालुक्यात एकूण 2 लाख 75 हजार 440 इतक्या नागरिकांचे लसीकरण आज अखेर पूर्ण करण्यात आलेले आहे.

इतर बातम्या