Breaking news

Lonavala Crime News l लोणावळ्यात घरात खेळणाऱ्या 2 वर्षीय बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न; एक जणावर गुन्हा दाखल

लोणावळा : लोणावळा गावठाण येथे एका घरात खेळणाऱ्या 2 वर्षीय बालिकेचे घरात घुसून अपहरण करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाला मुलीच्या पालकांनी आरडाओरडा केल्याने नागरिकांनी पकडुन लोणावळा पोलिसांच्या ताब्यात दिले. रविवारी (12 जानेवारी) रोजी दुपारी 1.20 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

     अमर त्रिपाठी (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा शहरचे प्रभारी पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील ह्या पुढील तपास करत आहेत.

इतर बातम्या