Breaking news

Lonavala Rural Police : दुचाकी चोरटा पोलिसांच्या सापळ्यात; एकविरा देवीच्या पार्किंगमधून चोरली होती गाडी

कार्ला (प्रतिनिधी) : आई एकविरा देवी मंदिर पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी गाडी चोरून पोबारा करणारा चोरटा लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या सापळ्यात सापडला आहे. मागील मंगळवारी सदर दुचाकी चोरीला गेली होती आठवड्यात दुचाकी चोराला पकडण्यात लोणवळा ग्रामीण पोलिसाना यश आले आहे.

     लोणावळा ग्रामीण पोलिसांंनी दिलेल्या माहितीनुसार संतोष देशमुख (रा देवघर) यांची मोटार सायकल क्र. (MH 14 BL 1295) गेल्या आठवड्यात पार्किंग मधून चोरीला गेली होती. याचा तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे हेड काँन्स्टेबल शकिल शेख यांच्याकडे सोपवण्यात आलेला होता. तपास करत असताना चोरीला गेलेली दुचाकी औढे या ठिकाणी  सुनिल कचरु मुळीक (मुळ रा. पेठ आंबेगाव पुणे) सध्या राहणार औढै लोणावळा याने चोरली असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार सापळा रचून दुचाकी चोरास अटक करण्यात आली. सदर आरोपीला कोर्टात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. सदर ही कामगिरी   लोणावळा उपविभागीय पोलीस आधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस निरिक्षक प्रविण मोरे, सहायक निरिक्षक सचिन रावळ, उपनिरिक्षक कुतूब खान, पोलीस हेड काँन्स्टेबल शकील शेख, पोलीस नाईक शरद जाधवर, पोलिस काँन्स्टेबल तळपे यांनी केली तर पुढील तपास शकील शेख करत आहे.

इतर बातम्या