Breaking news

लोणावळ्यात एका दुकानात महिलेच्या बॅगमधून पळविला दिड लाखांचा ऐवज

लोणावळा : येथील एका चप्पलच्या दुकानामध्ये खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतील सोन्याची पोत व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज पिशवीला ब्लेड मारत अज्ञात महिलेने पळविल्याची घटना गुरुवारी (दि. 15) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सबाबाई गबळू कालेकर (रा. प्रेमनगर, कुसगाव) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कालेकर ह्या काल दुपारी चेतन फुटवेअर या दुकानात खरेदीसाठी आल्या होत्या. त्यावेळी अज्ञात महिलेने त्याच्या पिशवीला ब्लेड मारत हातातील पिशवीमधील 90 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत व 60 हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला आहे. सदर महिलांचा चेहरा दुकानातील सिसीटिव्ही फुटेज मध्ये आला असून याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार महादेव म्हेत्रे तपास करत आहेत.

इतर बातम्या