Breaking news

Lonavala News : लोणावळ्यात यावर्षी शस्त्रपुजन व रावणदहन हिंदू राष्ट्रसेनेचे अध्यक्ष धनंजय भाई देसाईंच्या हस्ते होणार

मावळ माझा न्युजचा वाॅटसअप ग्रुप जाॅईन करा व मिळवा बातम्यांचे अपडेट्स क्षणाक्षणात

लोणावळा : विजयादशमी (दसरा) निमित्त हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण यांच्या वतीने दरवर्षी लोणावळा शहरांमध्ये शस्त्र पूजन व रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी शस्त्र पूजन व रावण दहन हे हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हिंदूतेजसुर्य धनंजय भाई देसाई यांच्या हस्ते गुरुवारी (6 ऑक्टोबर) रोजी सायंकाळी 6.30 वाजता करण्यात येणार आहे. याकरिता लोणावळा नगर परिषदेच्या पुरंदरे शाळा ग्राउंड वर रावणाची 40 फुटी भव्य प्रतिकृती उभारण्यात येणार असून त्याचे दहन व नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात येणार आहे. असत्यावर सत्याचा विजय म्हणून विजयादशमी हा दिवस साजरा केला जातो. प्रभू श्रीरामांनी याच दिवशी रावणाचा वध केला तसेच महिषासुरमर्दिनी देवी दुर्गा यांनी महिषासुर नावाच्या राक्षसाचा या दिवशी वध केला असल्याने या विजयाची साक्ष म्हणून विजयादशमी हा दिवस साजरा केला जातो. मागील दोन वर्ष कोरोना कालखंडामध्ये सर्वच सण उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले होते. यावर्षी मात्र लोणावळ्यात रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करत विजय महोत्सव होणार आहे. या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख व्याख्याते हिंदू तेजसुर्य धनंजय भाई देसाई हे एक प्रखर राष्ट्रभक्त असून हिंदू राष्ट्र सेनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. जास्तीत जास्त हिंदू बंधू भगिनी यांना या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी असे आवाहन हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर बातम्या