Breaking news

गडकिल्ल्यांचे पावित्र राखा; 31 डिसेंबरच्या पार्ट्यांना गडावर परवानगी देऊ नका - आमदार अमित गोरखे

मावळ माझा न्युज नेटवर्क : 31 डिसेंबरच्या पार्ट्यांना गडकिल्ल्यांवर परवानगी देऊ नका गड-किल्ल्यांचे पवित्र राखा व अशा पार्ट्यांवर निर्बंध आणण्यासाठी कडक निर्बंध लांब करा अशी मागणी विधान परिषदेचे सदस्य अमित गोरखे यांनी अधिवेशनात केली आहे.

     विधिमंडळ अधिवेशनात गड-किल्ल्यांच्या विधेयकावर चर्चा सुरू असताना गोरखे यांनी गड-किल्ल्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. गोरखे म्हणाले, महाराष्ट्रात अनेक गड किल्ले आहेत. त्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. गड किल्ल्यांवर 31 डिसेंबरला मोठ्या प्रमाणावर पार्ट्यांचे आयोजन केले जाते. त्यावर निर्बंध आणण्याची गरज आहे. त्याचबरोबर विविध कंपन्यांचा सीएसआर निधी असतो. त्या कंपन्यांना गड किल्ले संवर्धनासाठी दत्तक द्यावे.'

     पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सेल्फी घेताना अनेक अपघात होतात. ते रोखण्यासाठी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सुरक्षित असे सेल्फी पॉइंट निर्माण करण्याची गरज आहे, असे सांगून गोरखे म्हणाले, 'राजस्थानमध्ये अनेक राजवाडे पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक येत असतात. त्या धर्तीवर गड किल्ले पाहण्यासाठी आपल्याकडे पर्यटन विकास करण्याची गरज आहे. पर्यटनस्थळे नव्हे तर प्रेरणास्थळे होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

इतर बातम्या