Breaking news

फिनलंड मध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण - दृष्टिकोन - 2024

डॉ. योगेश गुरव : अलिकडच्या काळात, फिनलंड हा देश उच्च शिक्षणासाठी एक आश्वासक देश म्हणून उदयास आला आहे, व विशेषत: अभियांत्रिकीमधील पदवी व पदव्युत्तर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा दुवा ठरत आहे. ज्यात भारतीय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. 

खालील कारणामुळे हा देश आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

1) भारतीय विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेली लोकप्रियता, वाढलेली नोंदणी, भारतीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात फिनलंडची अभियांत्रिकी शिक्षणासाठी निवड करत आहेत. कारण तेथील उच्च दर्जाची शिक्षण प्रणाली, संशोधनवर असणारा भर व नवोपक्रमातील संधी.

 सांस्कृतिक विविधता -  फिनलंडमधील विद्यापीठे सक्रियपणे सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देतात व भारतीयांसह आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी पोषक वातावरण निर्माण करतात.

2) शैक्षणिक उत्कृष्टता आणि संशोधनातील संधी- अव्वल क्रमांकाची  विद्यापीठे - अल्टो विद्यापीठ आणि हेलसिंकी विद्यापीठ यासारख्या संस्था जागतिक स्तरावर त्यांच्या अभियांत्रिकी पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी मान्यताप्राप्त आहेत, जिथे अत्याधुनिक संशोधनासाठी संधी उपलब्ध आहेत.

नवोपक्रमावर लक्ष : फिनलंडच्या अभियांत्रिकी शिक्षणामध्ये व्यावहारिक कौशल्ये आणि नावीन्यपूर्णतेचा समावेश असून ते जागतिक पातळीवर उद्योगाच्या दर्जाशी मिळते-जुळते आहे.

3) शिष्यवृत्ती आणि आर्थिक सहाय्य पर्याय- 

सरकारी सहाय्य - फिनलंडचे सरकार आणि विद्यापीठे विशेषत: आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यासाठी विविध शिष्यवृत्तीचे पर्याय आणि अनुदान उपलब्ध करून देतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आर्थिक भार कमी होतो.

व्यवसायिक भागीदारी : फिनलंडमधील खूप कंपन्यानी विद्यापीठासोबत सहकार्यासाठी भागीदारी करार केलेले आहेत. या कंपन्या विविध संशोधन प्रकल्पांसाठी आर्थिक निधी उपलब्ध करायच्या संधी प्रदान करतात.

4) करिअरच्या उत्तम संधी आणि अनुदानाचे पर्याय - युरोपियन युनियनच्या नौकरीच्या बाजारात प्रवेश -  फिनलंडमध्ये शिक्षण पूर्ण केल्याने भारतीय विद्यार्थ्यांना युरोपियन युनियनच्या रोजगार बाजारपेठेत सहज प्रवेश मिळतो, तसेच जागतिक पातळीवर करिअरच्या शक्यताही वाढतात.

औद्योगिक कंपन्यांसोबत सहयोग : अभियांत्रिकी पदवी कार्यक्रम आणि फिनलंडमधील कंपन्या यांचे एकमेकासोबत सहकार्य असून ते विद्यार्थ्यांना इंटर्नशिप च्या  सुविधा आणि रोजगार संधी उपलब्ध करून देतात.

5) जीवनाची गुणवत्ता आणि सांस्कृतिक एकात्मता - जीवनाचा उच्च दर्जा- फिनलंड हे त्याच्या उच्च दर्जाचे राहणीमान, सुरक्षितता आणि कार्यक्षम नागरी सेवांसाठी चांगलेच प्रसिद्ध आहे, ज्यामुळे तो  विद्यार्थ्यांसाठी एक आकर्षक देश बनला आहे.

एकात्मतेसाठी सहाय्य : तेथील विद्यापीठे विविध भाषा अभ्यासक्रम आणि सांस्कृतिक एकात्मता कार्यक्रम या सारख्या सेवा सुविधा प्रदान करतात. ज्यामुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदव्युत्तर अभ्यासक्रमासोबत पूर्णपणे जुळवून घेण्यासाठी मदत होते. शैक्षणिक उत्कृष्टता, संशोधनाच्या संधी व त्यासाठी असणारे पोषक वातावरण या गोष्टींमुळे अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी परदेशातील  पदव्युत्तर शिक्षणासाठी फिनलंड हा एक उत्तम पर्याय आहे. जागतिक विकासाच्या पार्श्वभूमीवर फिनलंड हा देश अभियांत्रिकी शिक्षणातील सहजता आणि नवोपक्रमांची उपलब्धता यासाठी तसेच युरोपमध्ये किंवा इतरत्र कोठेही जाऊन यशस्वी करिअर करण्यासाठी एक अनोखा मार्ग उपलब्ध करून देणारा दीपस्तंभ आहे.

डॉ योगेश गुरव 

लेखक हे डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, वराळे तळेगाव येथे प्राध्यापक आहेत. (मो. 9763553560)

इतर बातम्या