Breaking news

युवासेना मावळ तालुक्याच्या वतीने मदतीचा टेम्पो कोकणकडे मार्गस्थ

लोणावळा : मुसळधार पावसामुळे कोकण मधील चिपळूण, खेड, महड(तळई) या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन खुप मोठी मनुष्य व वित्तहानी झाली आहे. 

    शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा 27 जुलै रोजी वाढदिवस असताना त्यांनी शिवसैनिकांना वाढदिवस साजरा न करता होईल ती मदत पुरग्रस्तांना करण्याचे आवाहन केले होते.

    त्याच माध्यमातून युवासेना प्रमुख शिवसेना नेते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या सुचनेनुसार युवासेना मावळ लोकसभा विस्तारक राजेश पळसकर व युवासेना जिल्हा समन्वयक अनिकेत घुले यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना मावळ तालुका अधिकारी (अध्यक्ष) शाम उत्तम सुतार यांच्या सहकार्याने, मावळ तालुक्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांनी स्वफुर्तीने पुढे येत मदत केली. यामध्ये युवासेना मावळ तालुक्याच्या वतीने 300 पेक्षा जास्त अन्नधान्य किट आणि 300 बाॅक्स पाणी बाॅटल आज सकाळी कोकण कडे मार्गस्थ झाले.

   युवासेना मावळ समन्वयक दत्ता केदारी, उपतालुका अधिकारी युवासेना विजय तिकोणे, विशाल दांगट, दिनेश पवळे, गणेश मोरे (देहु), संदिप भुंबक (देहूरोड), तानाजी सुर्यवंशी (लोणावळा) युवासेना आयटी सेल अधिकारी राकेश कालेकर, युवासेना विभाग अधिकारी शुभम गायकवाड, अक्षय,येळवंडे, निखील येवले, सलमान अत्तार, उपशहर अधिकारी विवेक भांगरे व युवासेना मा. समन्वयक लोणावळा शहर अमीत कदम, तळेगाव युवासेना उपअधिकारी रोहन माने, शाखा अधिकारी विशाल पोळ, फिरोज खान आदी पदाधिकाऱ्यांनी याकरिता मदत केली. तसेच या व्यतिरिक्त ज्यांनी यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत केली या सर्वांचे शाम सुतार यांनी आभार मानले.

इतर बातम्या