HSC RESULT : बारावीचा निकाल उद्या दुपारी ऑनलाईन जाहीर होणार
पुणे : महाराष्ट्र राज्य मंडळाचा बारावी परीक्षेचा निकाल उद्या मंगळवारी (21 मे) रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च व माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल मंगळवार, दि. 21 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. परीक्षा दिलेल्या राज्यातील सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे.
या संकेतस्थळावर पाहता येतील गुणपत्रिका
विद्यार्थ्यांना दि. 21 रोजी मंगळवारी दुपारी 1 वाजल्यानंतर 1) mahresult.nic.in
4) https://results.digilocker.gov.in
या संकेत स्थळांवर निकाल आणि गुण पाहता येतील आणि गुणपत्रिकेची प्रतही (प्रिंट आउट) घेता येईल.