Breaking news

लोणावळा नगरपरिषदेच्या स्वच्छता लिग क्रिकेट स्पर्धेत ग्रीन लोणावळा जायन्टस संघ विजयी तर माझी वसुंधरा वाॅरियर्स उपविजयी

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा अभियान 3.0  अंतर्गत लोणावळा स्वच्छता क्रिकेट लीग चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ग्रीन लोणावळा जायन्टस संघाने विजयावर नाव कोरले तर माझी वसुंधरा वाॅरियर्स संघाने स्पर्धेतील उपविजेता होण्याना मान पटकावला.

अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानाशी निगडीत असलेली नावे ही जनजागृती करिता संघाना देण्यात आली होती. यावेळी क्लीन लोणावळा टायटन्स,  7 स्टार लोणावळा, क्लीन लोणावळा फायटर्स, स्वच्छ लोणावळा टायगर्स, नमामी इंद्रायणी योद्धास, माझी वसुंधरा वाॅरीयर्स, लोणावळा जी.एफ.सी. लेजेन्द्स, ग्रीन लोणावळा जायंट्स अशा ह्या 8 संघामध्ये ही लीग पार पडली. ग्रुप अ मधून क्लीन लोणावळा टायटन्स व 7 स्टार लोणावळा हे दोन संघ तर ग्रुप ब मधून माझी वसुंधरा वोरीयर्स, ग्रीन लोणावळा जायन्ट्स हे संघ उपांत्य फेरीत पोचले. यामधील 7 स्टार लोणावळा व क्लीन लोणावळा टायटन्स ह्या संघामध्ये तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात क्लीन लोणावळा टायटन्स या संघाने बाजी मारली. तसेच अंतिम सामना हा ग्रीन लोणावळा जायन्ट्स व माझी वसुंधरा वाॅरीयर्स यांचेत झाला. यावेळी टॉस जिंकून लोणावळा जायन्ट्स यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांनी माझी वसुंधरा वाॅरीयर्स यांना फक्त 36 धावा 5 षटकात मध्ये करून दिल्या. 36 धावांचा पाठलाग करताना ग्रीन लोणावळा जायन्ट्स यांनी 6 बॉल व 6 खेळाडू राखून हा सामना जिंकला व लोणावळा स्वच्छता क्रिकेट लीग 2023 चे विजेतेपद पटकावले. या नाविण्यापूर्व अशा स्पर्धेत बक्षीस ही पर्यावरणपूरक ठेवण्यात आले होते. प्रथम क्रमांकास व्हिस्परींग वूड्स रिसोर्ट वलवण, लोणावळा यांच्या कडून  सायकल हे बक्षीस देण्यात आले. जेणेकरून वायू प्रदूषण होणार नाही सायकल चालवा हा संदेश लोकांमध्ये पोचेल. ट्रायोड एन्टरप्रायझेस पुणे यांनी द्वितीय क्रमांकास सोलर वर चालणारे लाईट बक्षीस देऊन अपारंपरिक उर्जास्त्रोतांचा वापर करू असा संदेश देण्यात आला. तृतीय क्रमांकास जंतुनाशक फवारणी मशीन हे स्वच्छतेसाठी सेवा बेरोजगार सहकारी संघटना लोणावळा यांचेमार्फत देण्यात आले. तसेच यावेळी महिलांचे दोन विशेष सामने घेण्यात आले. या दोन्ही सामन्यात एल एम सी पायोनीर यांनी रेनबो वोरीयर्स लोणावळा या संघास पराभूत केले. सर्व विजेते व पराभूत संघ व विशेष पुरस्कार यांना लोणावळा फर्स्ट इम्प्रेशन आणि गौतम रजनी यांचेमार्फत वृक्ष भेट देण्यात आले. या सामन्यास उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला. तसेच सामने खेळवण्यासाठी गवळीवाडा येथील ग्राउंड चे रुपडे पालटले. सर्व भिंतीवर क्रिकेटपटू व ऑलिंपिक यांची भिंतीचित्रे व स्वच्छ सुंदर संदेश लिहिण्ण्यात आले होते. अतिशय उत्कृष पद्धीतीचे नियोजन येथे करण्यात आले होते. यावेळी माजी नगरसेवक निखील कवीश्वर यांनी सर्व संघास किट चे वाटप तसेच नष्टा व जेवण्याचे वाटप हे माजी नगरसेवक निखील कवीश्वर व राजू बच्चे यांनी केले होते. तसेच या लीगची सुरुवात ही वृक्षारोपण करून झाली.  यावेळी मुख्याधिकारी व प्रशासक पंडित पाटील, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी नगरसेवक सुधीर शिर्के, राजू बच्चे,  दिलीप लोंढे, प्रमोद गायकवाड, निखील कवीश्वर, विशाल पाडाळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी व मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण लीग मध्ये स्वच्छ लोणावळा सुंदर लोणावळा हरित लोणावळा हे घोषवाक्य देऊन जनजागृती करण्यात आली. संपूर्ण क्रिकेट लीग चे सूत्रसंचालन हे विशाल पाडाळे व अक्षय पाटील यांनी केले.   तसेच यावेळी विशेष अशी बक्षिसे वृक्ष म्हणून देण्यात आलीत. यातील काही बक्षिसे खालीलप्रमाणे : उत्कृष्ट गोलंदाज: समी मुल्ला, उत्कृष्ट फलंदाज: संकेत जाधव, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक: यशवंत मुंडे, उत्कृष्ट झेल: भारत गायकवाड, अंतिम सामना सामनावीर व मालिकावीर समी मुल्ला, सलग चार चौकार: यशवंत मुंडे, सलग दोन वेळा दोन आउट : डॉ. भगवान खाडे, महिला उत्कृष फलंदाज: वैशाली मठपती, सलग चार चौकार: दीक्षा गायकवाड, महिला संघ विजेता: रेनबो वाॅरीयर्स लोणावळा ( कॅप्टन: वैशाली मठपती)

प्रथम क्रमांक: ग्रीन लोणावळा जायन्ट्स (कॅप्टन: विजय नायडू), द्वितीय क्रमांक : माझी वसुंधरा वाॅरीयर्स (कॅप्टन: हर्षल  धुळे ), तृतीय क्रमांक: क्लीन लोणावळा टायटन्स (कॅप्टन: भारत गायकवाड)

इतर बातम्या