Breaking news

Sunil Shelke l लाखाचे मानकरी असलेल्या जनसेवक आमदार सुनील शेळके यांना मंत्रिपदाची संधी द्या; मावळातील कार्यकर्त्यांची भावना


मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र येत तयार केलेल्या मावळ पॅटर्नला सुरुंग लावत एक लाखाहून अधिक मतांचे मताधिक्य घेत विजय झालेले मावळ तालुक्याचे जनसेवक आमदार सुनील आण्णा शेळके यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये मंत्री पदाची संधी द्यावी अशी भावना मावळ तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी अजित दादा पवार यांची भेट घेत तशी मागणी केली आहे. लोणावळ्यातील जागरूक नागरिक व मी लोणावळाकरचे सदस्य डॉक्टर किरण गायकवाड यांनी देखील अजितदादा पवार यांच्याकडे तशी मागणी केली आहे. मावळ तालुक्यात अनेक भागांमध्ये आमदार सुनील शेळके यांचे विजयाचे बॅनर लावताना त्यावर भावी मंत्री असा उल्लेख देखील करण्यात आला असल्याने तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्त्यांची आमदार सुनील शेळके हे नामदार व्हावेत अशी भावना त्यामागे आहे. 

     2019 या वर्षामध्ये 94 हजाराचा लीड तर 2024 या वर्षांमध्ये तब्बल 1 लाख 8 हजार 565 मतांचा लीड घेत आमदार सुनील शेळके विजयी झाले आहेत. आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात यावर्षी मावळ तालुक्यातील सर्वपक्षीय नेते मंडळी अगदी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर केवळ महिनाभरामध्ये एकत्र येत सुनील शेळके यांचा पराभव करण्यासाठी मावळ पॅटर्न तयार करत एकवटले होते. आमदार सुनील शेळके यांनी मावळ तालुक्यात विकास कामे करताना आम्हाला विश्वासात घेतले नाही, वैयक्तिक द्वेष व वैयक्तिक वादा यामधून हे सर्व नेते मंडळी एकत्र येत सुनील शेळके यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार देत मावळ तालुक्यात सुनील शेळके विरुद्ध सर्व नेते मंडळी अशी लढत दिली होती. मात्र सर्वसामान्य जनता ही आमदार सुनील शेळके व त्यांनी केलेली विकास कामांच्या सोबत राहिल्याने सुरुवातीच्या काळात अतिशय अटीतटीची वाटणारी ही निवडणूक सुनील शेळके यांनी जनमताच्या कौलावर एकमताने जिंकली. सर्वजण एकवटलेले असताना देखील त्यांनी एक लाखाहून अधिक मतांचे मताधिक्य घेत विजय मिळवला आहे. दस्तूर खुद्द अजितदादा पवार, सुनील तटकरे यांनी सुनील शेळके यांच्या या विजयाचे तोंड भरून कौतुक केले तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील सुनील शेळके यांचे कौतुक व अभिनंदन केले. अशा या जनसेवक आमदाराला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यास निश्चितच ते महाराष्ट्रामध्ये विकास कामांचा धडाका लावतील. मावळ तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ते लोकप्रिय असे तरुण आमदार म्हणून परिचित आहेत. त्यांच्या या लोकप्रियतेचा निश्चितच महायुती सरकारला फायदा होईल अशी अपेक्षा आमदार सुनील शेळके यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. 

     कार्यकर्त्यांच्या या भूमिकेवर बोलताना आमदार सुनील शेळके देखील म्हणाले, अजित दादा म्हणतील तसे.. उद्या मला मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली व कोणत्या देखील विभागाचे मंत्रीपद मला मिळाले तरी त्या विभागाला न्याय देत जास्तीत जास्त निधी आणत मावळ तालुका व संपूर्ण महाराष्ट्र मध्ये त्या विभागाला व मंत्रीपदाला मानाचे स्थान कामाच्या माध्यमातून निर्माण करून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

इतर बातम्या