Breaking news

राज्यात नवरात्रोत्सवात यंदाही गरबा दांडियाला परवानगी नाही; राज्य शासनाकडून नियमावली जारी

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन नवरात्रोत्सव साजरा करणे योग्य होणार नाही. त्यामुळे या काळात गरबा, दांडिया व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत अशा सूचना सोमवारी राज्याच्या गृह विभागाने जारी केल्या आहेत. 

    यंदाच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाचा धोका कायम असल्याने नवरात्र उत्सवात नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळजी घेणे आवश्यक असल्याचे गृह विभागाच्या पत्रकात नमूद केले आहे.

काय आहेत मार्गदर्शक सूचना

• नवरात्र उत्सव साधेपणाने साजरा करावा

• मंडप मर्यादित स्वरूपाचे उभारा सार्वजनिक नवरात्र उत्सवासाठी स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक

• सार्वजनिक मंडळांनी देवीच्या मूर्तीची उंची चार फूट ठेवावी

• घरगुती देवीच्या मूर्तीची उंची दोन फुटांच्या मर्यादेत असावी

• देवीच्या मूर्तीऐवजी शक्यतो धातू किंवा संगमरवरी मूर्तीचे पूजन करावे 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेची जनजागृती करावी

• गरबा-दांडिया - सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य उपक्रम करा

• देवीच्या दर्शनाची ऑनलाइन सुविधा ठेवावी आरती, भजन, कीर्तनाला गर्दी नको

• मंडपात पाचपेक्षा अधिक कार्यकर्ते नकोत

• घरगुती देवीच्या मूर्तीची उंची दोन फुटांच्या मर्यादेत असावी

• मंडपामध्ये खाद्यपदार्थ व पेयपानावर बंदी

• देवीचे आगमन व विसर्जन मिरवणुका नको कृत्रिम तलावात देवीच्या मूर्तीचे विसर्जन करा

• दसर्‍याला रावणदहनाचा कार्यक्रम नियम पाळून करावा.

इतर बातम्या