Breaking news

लोणावळा व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष बच्चुभाई पत्रावाला यांचे निधन

लोणावळा : लोणावळा शहरातील प्रसिद्ध कापड व्यावसायिक व लोणावळा व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष, माजी नगरसेवक बच्चुभाई पत्रावाला यांचे आज सोमवारी (28 जुन) सायंकाळी दुःखद निधन झाले.

    बच्चुभाई हे लोणावळ्यातील प्रसिद्ध कापड व्यापारी होते. लोणावळा शहराच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय वाटचालातील त्यांचा मोलाचा वाटा होता. व्हीपीएस शाळा समितीचे अध्यक्ष, गुजर‍ाती जैन समाज मंडळाचे पदाधिकारी अशा विविध संघटना व संस्थावर बच्चुभाई कार्यरथ होते. सतत हसतमुख व आनंदी चेहरा व संयमी व्यक्तीमत्व ही बच्चुभाईंची जमेची बाजु होती. लोणावळा शहर‍च्या शैक्षणिक वाटचालीत त्याचा मोलाचा वाटा आहे. व्यापारी संघटनेचे अनेक वर्ष त्यांनी अध्यक्ष पद भुषविले आहे. त्यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या