Breaking news

सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलाने केला सावत्र आईचा खून

तळेगाव दाभाडे : आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. सावत्र आई त्रास देत असल्याच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलाने धारदार कोयत्याने सपासप वार करून सावत्र आईचा निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. या घटनेमुळे तळेगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

   रेखा अरविंद जाधव (वय-40, रा.श्रीहरी कॉलनी, तळेगाव दाभाडे) असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

   तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत रेखा जाधव हिचे ऐकून पती अरविंद हा दुसरी पत्नी व अल्पवयीन आरोपी मुलगा यांना सतत त्रास देऊन मारहाण करत होता. त्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर सदर अल्पवयीन मुलाने याचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सदर मुलाने धारदार कोयता आपल्या जवळ बाळगून बुधवारी रात्री आठ वाजता सावत्र आई रेखा जाधव तिच्या घरी गेला. त्यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाले. या वादातून व सतत होणाऱ्या त्रासामुळे वैतागलेल्या सदर अल्पवयीन मुलाने सावत्र आई रेखा जाधव यांच्या डोक्यावर धारदार कोयत्याने सपासप वार करून निर्घुण खून केला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करत या प्रकरणी संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलिस करीत आहेत.

इतर बातम्या