Breaking news

खोपोली येथील फेमस रमाकांत वड्याचे सर्वेसर्वा रमाकांत साखरे यांचे निधन

खोपोली (प्रतिनिधी) : संपूर्ण जगात "रमाकांत" नावाने फेमस असलेला बटाटे वडा ज्यांच्या नावे सुरू केला गेला होता त्या रमाकांत गोपीनाथ साखरे यांची वयाच्या 86 व्या वर्षी प्राणज्योत मालवली.

    5 जुलै 1936 रोजी रमाकांत यांचा जन्म झाला आणि त्याच दिवशी त्यांच्याच नावे रमाकांत हॉटेलचे उद्घाटन केले गेले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात खंडाळा (बोर) घाटातील अवघड टप्पे पार करण्यात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाणारे वाहन चालक शीळ फाट्यावर मोठाल्या पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या रमाकांत हॉटेलमध्ये विश्रांती घ्यायचे, नाश्ता करायचे आणि मग पुढे जायचे. म्हणता म्हणता रमाकांत थोडा खवय्यांची ओळख बनली. रमाकांत या नावाची बिरुदावली मिरविणाऱ्या रमाकांत साखरे यांचे आज रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी दोन चिरंजीव, एक कन्या, नातवंडे त्याच सोबत खूप मोठा परिवार आहे. महाराष्ट्राच्या वाणी समाजातील प्रसिद्ध अश्या साखरे कुटुंबातील सर्वात वयाने ज्येष्ठ असलेल्या रमाकांत साखरे यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे.

इतर बातम्या