Breaking news

Expressway News : एक्सप्रेस वेवर डांबर वाहतूक करणार्‍या टँकरला लागली आग

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दस्तुरी जवळ एका डांबर वाहतूक करणार्‍या टँकरला अचानक आग लागली आहे. आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये टँकरचा दर्शनी भाग जळाला आहे. तसेच टाकीला देखील आग लागली होती. अपघाताची माहिती समजताच एक्सप्रेस वेवरील देवदूत यंत्रणा, खोपोली फायर ब्रिगेड ची टीम, आय आर बी पेट्रोलिंग, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे सदस्य यांनी रेस्कू करत सदर आग आटोक्यात आणली. टँकरमध्ये डांबर असल्याने टाकीमधून वाफांच्या ज्वाळा दिसत होत्या. आग विझवत टँकर कुलिंगसाठी जाग्यावरच थांबवून रस्त्यावरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे. या घटनेमुळे काहीकाळ एक्सप्रेस वेवर वाहतूककोंडी झाली होती.

इतर बातम्या