Breaking news

Expressway Accident : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भिषण अपघातात दुभाजक घुसले कार मध्ये; एक ठार एक जखमी

खोपोली : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा एक्झिट याठिकाणी आज दुपारी एक विचित्र अपघात घडला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या एका कारच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दुभाजकाला धडकली. यामध्ये दुभाजकाचा लोखंडी पत्रा थेट कारमध्ये घुसल्याने चालकाच्या बाजुला बसलेली महिला गंभिर जखमी होऊन मृत्यूमुखी पडली तर चालक जखमी झाला आहे. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुप्रिया किसन माने (वय 30, रा. कल्याण) याचा या अपघातात मृत्यू झाला असून चालक शेखर शिंदे (वय 31, रा. भिवंडी) हे जखमी झाले आहेत. 

इतर बातम्या