Breaking news

Expressway Accident Breaking : एक्सप्रेस वेवर सहा वाहनांचा भिषण अपघात; 3 जण जागीचा ठार

खोपोली (प्रतिनिधी) : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास खंडाळा घाटातील किमी 39 येथे सहा वाहनांचा विचित्र व भिषण अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यंत्रणांनी अथक परिश्रम करत सदरच्या वाहनांमध्ये आडकलेले मृतदेह व जखमी यांना बाहेर काढत व अपघातग्रस्त वाहने बाजुला करत खोळंबलेली वाहतूक साडेसहा सातच्या सुमारास सुरु केली आहे.

     मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणार्‍या एका टेम्पो चालकांचे नियंत्रण सुटल्याने समोरील भाजीच्या टेम्पोवर आदळला, तो टेम्पो समोरील कारवर आदळला तसेच कोंबडी वाहक टेम्पोने एका प्रवासी बसला धडक दिली तर एक कार टेम्पो व ट्रेलरच्या मध्ये चिरडली गेली. अशा प्रकारे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये एका हुंदाई कारमधील चालक व अन्य एक जण असे दोन तर कोंबडी वाहक टेम्पोचा चालक असे एकूण 3 जण या अपघातात मयत झाले असून सहा जणांना वाचविण्यात यश आले आहे.

    बोरघाट पोलीस, खोपोली वाहतूक पोलीस, आयआरबी, डेल्टा, मृत्युंजय देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीला संस्थेचे कार्यकर्ते, लोकमान्यची टिम ऐवढ्या यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत मयत व जखमी यांना बाहेर काढले. तसेच वाहतूक सुरळीत केली.

इतर बातम्या