Breaking news

Election Update : महाराष्ट्रात निवडणुका जुलैनंतर होणार; पावसाचा अंदाज घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहिर होण्याची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा, नगरपंचायती यांच्या निवडणुका जुलै नंतर होण्याची शक्यता आहे. मा. सर्वोच्च न्यायालयात आज निवडणूक आयोगाच्या अर्जावर सुनावणी झाली. यामध्ये सरकसट सर्व निवडणुका पावसाळ्यानंतर घेण्याऐवजी ज्या भागात पाऊस कमी आहे त्या पावसाळ्यात व उर्वरित पावसाचा अंदाज घेऊन घेण्यात याव्यात असे न्यायालयाकडून सूचित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोकण, रायगड भागातील पाऊस सर्वश्रूत असल्याने महानगरपालिका सह सर्वच निवडणुका पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक आयुक्तांनी हवमान विभागाशी चर्चा करून निवडणूक कार्यक्रम जाहिर करू असे म्हंटले आहे. सर्वच निवडणुकांसाठी प्रभागरचना कार्यक्रम जाहिर करण्यात आला असून सुचना हरकती व अन्य तयारी सुरु आहे. पावसाचा अंदाज घेऊन दोन टप्प्यात निवडणुका घेण्याची देखील तयारी करण्यात येणार आहे. 

      निवडणूक कार्यक्रम पावसाळ्यानंतर जाहिर होण्याची शक्यता बळावली असल्याने इच्छुकांना काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. मतदारांना खुश करण्याची कोणतीच संधी इच्छुक सोडत नसल्याने कोरोनानंतर यंदा येणारा गणेशोत्सव, नवरात्र उत्सव व अन्य सण यावर्षी जोरात साजरे होण्याची शक्यता आहे. 

इतर बातम्या