Breaking news

EKVIRA YATRA : हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये कार्ला गडावर महानवमी होम संपन्न

होमाचे Live व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा


लोणावळा : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या वेहेरगाव (कार्ला) येथील आई एकविरा देवीच्या गडावर हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी (14 आँक्टोबर) च्या पहाटे 3.30 वाजता महानवमीचा होम प्रज्वलित करण्यात आला.

होमाचे Live व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

    लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या उपस्थितीमध्ये देवीचे पुजारी, गुरव, वेहेरगावचे सरपंच, पोलीस पाटील, प्रशासकीय समिती व्यवस्थापक व भाविक यांच्या हस्ते पहाटे 3.30 वाजता धार्मिक व विधवत पद्घतीने होम पेटविण्यात आला. रात्रीपासून भाविकांना होमाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. भाविकांची गर्दी ध्यानात घेता बुधवारी 24 तास मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गुरव प्रतिनिधी नवनाथ देशमुख यांच्या हस्ते देवीच्या महानवमी होमाचा विधी पार पडला.

    तब्बल दिड वर्षानंतर मंदिरे दर्शनासाठी खुली झाल्याने नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेपासून भाविकांची कार्ला गडावर दर्शनासाठी गर्दी होती. पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख, लोणावळा उपविभागाचे पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी चोख बंदोबस्त तैनात केल्याने अतिशय शांततेमध्ये देवीची नवरात्र यात्रा पार पडली. किमान 5 ते 7 लाख भाविकांनी या उत्सवात देवीचे दर्शन घेतले. वेहेरगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच प्रशासकीय समिती व्यवस्थापक व कर्मचारी यांनी देखील यात्रा शांततेमध्ये पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

होमाचे Live व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा


इतर बातम्या