Breaking news

Eknath Shinde : मी कोणत्या आमदारांचे अपहरण केलेले नाही; माझ्या सोबत 45 आमदार

सत्तेसाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही - एकनाथ शिंदे

मुंबई : सत्तेसाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी व अनंत दिघे साहेब यांच्या विचारांशी तडजोड करणार नाही असे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट केले. तसेच मी कोणतेही आमदारांचे अपहरण केलेले नाही माझ्यासोबत 45 आमदार आहेत व ते स्वखुशीने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सोबत आले असल्याचा खुलासा शिंदे यांनी केला आहे. मी कालही बाळासाहेबांचा शिवसैनिक होतो, आजही आहे व उद्याही बाळासाहेबांचा शिवसैनिक असेल असे यावेळी खडसावून सांगितले. शिंदे म्हणाले मी अद्याप शिवसेना सोडलेली नाही, तसे वक्तव्य केलेले नाही किंवा इतर कोणत्या पक्षासोबत देखील गेलेलो नाही तरी देखील माझे पुतळे जाळले जात आहेत. मला बदनाम केले जात आहे. या भावना काल मिलिंद नार्वेकर यांच्या भेटी दरम्यान मी व्यक्त केल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील मी याबाबत सांगितले आहे. मला गटनेते पदावरून हाटविण्यात आले आहे. खरंतर संख्याबळ माझ्याकडे जास्त आहे याबाबत योग्य वेळी भूमिका मांडू असे त्यांनी सांगितले. हिंदुत्वाच्या मुद्दयाबाबत मागील अडीच वर्षात अनेक वेळा आमदारांच्या भावना उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडल्या आहेत. काल देखील तेच सांगितले आहे. सुरत असो व गुवाहाटी जाणे हा आमचा स्टॅट्रिजीचा भाग असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

इतर बातम्या