Breaking news

डॉ. किरण गायकवाड यांनी दिला काँग्रेस पक्षाचा राजीनामा; पुढील भूमिका गुलदस्त्यात

लोणावळा : काँग्रेस पक्षाचे माजी मावळ तालुकाध्यक्ष व माजी पुणे जिल्हा सरचिटणीस डॉ. किरण शंकरराव गायकवाड यांनी त्यांच्या पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांना ईमेलद्वारे गायकवाड यांनी वैयक्तिक कारणास्तव आपण आपल्या सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षात जाणार याबाबत मात्र त्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. 

      डॉ. किरण गायकवाड यांनी काँग्रेस पक्षात काम करताना आजवर नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया चे शहराध्यक्षपद, मावळ तालुका युवक अध्यक्ष पद, तालुका अध्यक्षपद, जिल्हा सरचिटणीस पद आदी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहे. शिवाय 2014 साली त्यांनी काँग्रेस पक्षाकडून मावळ विधानसभा निवडणूक देखील लढवली आहे. मागील काही काळापासून पक्षात ते फार सक्रिय नव्हते. मावळ वार्ता फाउंडेशन सारख्या सामाजिक संस्थेसाठी ते सध्या काम करीत असून मराठा आरक्षण आंदोलनात देखील ते आघाडीवर असतात. त्यांची पत्नी सौ. शुभांगी गायकवाड या संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना येथे विद्यमान संचालक आहे. गायकवाड यांनी राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षात जाणार यावर बोलणे टाळले असून अनेक जण संपर्कात आहेत मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असे सांगत त्यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.

इतर बातम्या