Breaking news

वडगाव मध्ये कोविड महालसीकरण निमित्त पौष्टीक आहार चे वाटप

वडगाव मावळ : जय जवान जय किसान मित्र मंडळ व छावा प्रतिष्ठाणाच्या वतीने मोफत कोविड महालसीकरण प्रभाग क्र.6, खंडोबा मंदिर येथील व गावातील मावळ हॉस्पिटल, विघ्नहर्ता हॉस्पिटल, माऊली हॉस्पिटल व मातोश्री हॉस्पिटलमध्ये चालू असलेल्या लसीकरण केंद्रावरील नागरिकांना फळे, बिस्किटे, पेयजल या पौष्टिक आहाराचे वाटप मावळ भाजपचे प्रभारी भास्करराव  म्हाळसकर यांचे हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन शेखर वहिले कार्याध्यक्ष भाजपा यु.मो यांच्या वतीने करण्यात आले होते.

     याप्रसंगी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, वडगाव शहर भाजपचे अध्यक्ष अनंता कुडे, माजी अध्यक्ष मनोज भाऊ ढोरे, किरण भिलारे, नगरसेवक प्रविण चव्हाण, प्रसाद पिंगळे, तालुका भाजपचे उपाध्यक्ष विठ्ठलराव घारे, माजी सरपंच नामदेव भसे, युवक अध्यक्ष विनायक भेगडे, रमेश ढोरे, भुषण मुथा, गणेश वहिले, योगेश ढोरे, ओमकार शिंदे, निखिल वहिले, निखिल तारू आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

    वडगाव शहरात सुरू असलेल्या लसीकरण अभियानाचा लाभ स्थानिक नागरिकांनी घ्यावा व कोरोना महामारीला वडगाव मधून हद्दपार करावे, असे मत मावळ भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी यावेळी व्यक्त केले.

इतर बातम्या