Breaking news

शिवक्रांतीच्या वतीने पोलीस ठाण्यांमध्ये मास्क व सॅनिटायझर वाटप

लोणावळा : शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस व कामगार नेते अँड. विजयराव पाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा शहर, लोणावळ ग्रामीण, तळेगाव दाभाडे, हिंजवडी पोलीस ठाण्यात शिवक्रांती कामगार संघटना व हिंजवडी येथील एडियन कंपनी युनिटच्या वतीने मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. तसेच कोरोना काळात लोणावळा शहर व ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत गोरगरिबांना मदत करणारे पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर व पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

   यावेळी शिवक्रांती कामगार संघटनेचे चिटणीस रमेश पाळेकर, संघटक प्रतिक पाळेकर, रोहन आहेर, प्रथमेश पाळेकर व एडियन कंपनी कामगार संघटना युनिटचे प्रतिनिधी उपस्थित होते.

इतर बातम्या